Achievements

राज्यशासनातर्फे संजय देवधर यांना आदिवासी-सेवक पुरस्कार जाहीर
नाशिक( प्रतिनिधी) आदिवासीच्या सर्वांगिण विकासासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना आदिवासी - सेवक पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यंदाच्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून नाशिकचे ज्येष्ठ पत्रकार आणि आदिवासी वारली चित्रशैलीचे अभ्यासक संजय देवधर यांना आदिवासी- सेवक पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. रुपये २५ हजार १ रोख, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. संजय देवधर यांनी आदिवासी वारली चित्रकलेवर संशोधन केले. पद्मश्री जिव्या सोमा मशे यांचे मार्गदर्शन त्यांना मिळाले. गेली १५ वर्षे ते वारली आर्ट फाउंडेशनच्या माध्यमातून वारली चित्रसृष्टी प्रशिक्षण कार्यशाळांचे सातत्याने आयोजन करतात. आतापर्यंत ५ ते ७५ वयोगटातील हजारो जणांना देवधर यांनी वारली चित्रकला शिकवली आहे. अनेक परदेशी पर्यटकही त्यांच्याकडे शिकले आहेत. गेल्याच आठवड्यात फ्रान्सची लॉरियान फेरांदो हिने प्रशिक्षण घेतले. संजय देवधर यांनी ' वारली चित्रसृष्टी 'या पुस्तकाच्या ४ आवृत्ती आणि ' वारली आर्ट वर्ल्ड ' या इंग्रजी पुस्तकाच्या २ आवृत्ती त्यांच्याच कल्पक प्रकाशनातर्फे प्रकाशित केल्या आहेत. त्यांना सुजाण वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. ऑगस्ट २०१८ मध्ये संजय देवधर यांनी अनेकांच्या सहकार्याने वारली चित्रकलेत दोन विश्वविक्रम प्रस्थापित केले. १२०० जणांची ऑन द स्पॉट चित्रस्पर्धा घेऊन वंडरबूक रेकॉर्ड केले. वारली चित्रशैलीद्वारे सामाजिक संदेशाच्या विश्वविक्रमाची नोंद जिनियस बुक ऑफ रेकॉर्डसने घेतली. मध्यन्तरी ' चित्रांजली ' उपक्रम राबवून अनेक माध्यमात विद्यार्थ्यांनी वारली चित्रे रंगवून पद्मश्री जिव्या सोमा मशे यांना श्रद्धांजली अर्पण केली.


Ketaki Deodhar, 16 , Student of lala lajpatrai college. I am a dancer. Completed arangetram.Under the guidance of my gurus, I got opportunity to perform at Chidambaram. Also I got a chance to perform in Chennai for Guinness World Record. In 2015-16 I have successfuly participated in Folk Dance Festival at Spain and Netherlands. Won CM chashak in the year 2018 both in group and solo.